News Flash

Corona: राज्यातील रुग्णसंख्येत घट; रिकव्हरी रेट वाढून ९३.५५ टक्क्यांवर

राज्यात एकूण २,७१,८०१ सक्रीय रुग्ण

राज्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे. राज्यात रविवारी २२ हजार ५३२ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत एकूण ५३ लाख ६२ हजार ३७० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३.५५ टक्के इतकं झालं आहे. तर मागच्या २४ तासात १८ हजार ६०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या राज्यात एकूण २ लाख ७१ हजार ८०१ सक्रीय रुग्ण आहेत. करोनामुळे राज्यात एका दिवसात ४०२ जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.६५ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्या करण्यात आलेल्या ३ कोटी ४८ लाख ६१ हजार ६०८ नमुन्यांपैकी ५७ लाख ३१ हजार ८१५ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्यातील करोना पॉझिटिव्हीटी दर १६.४४ टक्के इतका आहे.

प्रमुख जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या

  • मुंबई- २८,०१५
  • ठाणे- १९,३०६
  • पुणे- ३९,४६६
  • नाशिक- ९,८१३
  • औरंगाबाद- ४,२५२
  • नागपूर- १२,२९६

पुण्यात एकाच दिवसात ४८६ रुग्ण नव्याने आढळले, तर 28 रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात ४८६ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर ४ लाख ६९ हजार ७४७ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान २८ रुग्णांचा मृत्यू झाला असून ८ हजार २३२ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान ८८७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ४ लाख ५४ हजार ९०० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

देशातील मृतांचा आकडा चिंता वाढवणारा!; मे महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद

मुंबईतही करोनाचा फैलाव आटोक्यात
मुंबईत गेल्या २४ तासात १ हजार ६६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के इतका आहे. रुग्ण दुप्पटीचा वेग हा ४१४ दिवसांवर पोहोचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 9:05 pm

Web Title: maharashtra corona patient reduce and recovery rate increase by 93 percent rmt 84
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 Maharashtra Lockdown : राज्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम!; काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध आणखी कडक करणार
2 धक्कादायक! घरगुती वादातून शिवसेना पदाधिकारी सूनेच्या तोंडावर थुंकला; भाजपाचा कट असल्याचा दावा
3 “चंद्रकांत पाटलांना फार मस्ती आली आहे”; हसन मुश्रीफ संतापले
Just Now!
X