राज्यात गेल्या काही दिवसात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. राज्यात करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.३४ टक्के इतकं झालं आहे. मागच्या २४ तासात ७ हजार ७५६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ६० लाख १६ हजार ५०६ रुग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर ७ हजार ३०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत ४ कोटी ६२ लाख ६४ हजार ५९ जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ६२ लाख ४५ हजार ५७ जणांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे प्रमाण १३.५ टक्के इतकं आहे. सध्या राज्यात ९४ हजार १६८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ५ लाख ५१ हजार ८७२ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ३ हजार ७४३ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १२० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.०९ टक्के इतका आहे.

मुंबईत गेल्या २४ तासात ३९२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५०२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत ७ लाख ८ हजार ७१६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. मुंबई रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ टक्के इतकं आहे. सध्या मुंबईत ५ हजार ८९७ रुग्ण सक्रिय आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर हा १ हजार १५२ वर पोहोचला आह. १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान रुग्ण वाढीचा दर ०.०६ टक्के इतका होता.

केंद्रीय आरोग्यमंत्रालाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासात ४१ हजार ३८३ नवे रुग्ण आढळले. तर ३८ हजार ६५२ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच ५०७ रुग्णांचा करोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४ लाख ०९ हजार ३९४ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

भाजपाच्या १२ निलंबित आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव; राज्य सरकारच्या कारवाई विरोधात याचिका

आतापर्यंत देशात ३ कोटी १२ लाख ५७ हजार ७२० करोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ कोटी ०४ लाख २९ हजार ३३९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ४ लाख १८ हजार ९८७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचा पर्याय असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे देशात लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत देशात ४१ कोटी ७८ लाख ५१ हजार १५१ लसीचे डोस देण्यात आले आहेत.