News Flash

Maharashtra Corona: राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलं; रिकव्हरी रेट ९१.०६ टक्के!

एका दिवसात ५१ हजार ४५७ रुग्णांची करोनावर मात

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात करोना रुग्ण संख्येत घट होत होताना दिसत आहे. मागच्या २४ तासात ५१ हजार ४५७ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांनी घरी सोडण्यात आलं आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ९१.०६ टक्के इतकं झालं आहे. तर एका दिवसात ३४ हजार ३१ नवे करोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. राज्यात करोनामुळे एका दिवसात ५९४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.५४ टक्के इतका आहे. राज्यात ३० लाख ५९ हजार ९५ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर २३ हजार ८२८ रुग्ण संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत. आजपर्यंत राज्यात ३ कोटी १८ लाख ७४ हजार ३६४ जणांचा करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५४ लाख ६७ हजार ५३७ जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या राज्यात ४ लाख १ हजार ६९५ सक्रीय करोना रुग्ण आहेत

जिल्हा निहाय सक्रिय रुग्ण

  • मुंबई- २९,४४५
  • ठाणे- २८,३८३
  • पुणे-६७,२९५
  • नाशिक- १८,४३२
  • औरंगाबाद- ७,३३७
  • नागपूर- २३,२७२

पुण्यात एकाच दिवसात १ हजार १६४ रुग्ण नव्याने आढळले, तर ४८ रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात १ हजार १६४ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर ४ लाख ६२ हजार १७२ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान ४८ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७ हजार ८४३ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान २ हजार ४०७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ४ लाख ३९ हजार ९७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मोठी बातमी! १० जूनपासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा; ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबईत करोना रुग्णसंख्येत घट

मुंबईत गेल्या २४ तासात १३५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४,५६५ रुग्णांनी करोनावर मात केल्यानं त्यांन घऱी सोडण्यात आलं आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्के आहे. सध्या मुंबईत २९,६४३ सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर २६९ दिवसांवर पोहोचला आहे. १२ मे ते १८ मे दरम्यात रुग्णवाढीचा दर हा ०.२५ टक्के इतका होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 8:28 pm

Web Title: maharashtra corona update recovery rate increase by 91 percent rmt 84
टॅग : Corona
Next Stories
1 करोनामुक्तीचा हिवरेबाजार पॅटर्न; गावकरी आणि त्यांचा पुढारी यांच्या समन्वयाने गावातून करोना हद्दपार
2 “माझा दीड वर्षांचा अनुभव, मी घरातूनच राज्य चालवतोय…”
3 “….तुम्हाला अजिबात गांभीर्य नाही,” मुंबई हायकोर्टाने ठाकरे सरकारला सुनावलं
Just Now!
X