11 August 2020

News Flash

राज्यात २ हजार २८७ नवे करोना रुग्ण; १०३ जणांचा मृत्यू

१ हजार २२५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी

संग्रहीत छायाचित्र

महाराष्ट्रात आज २ हजार २८७ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांची एकूण संख्या आता ७२ हजार ३०० इतकी झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. तर दुसरीकडे आज १०३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आज राज्यात २ हजार २८७ जणांची वाढ आहे. तर १०३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे एक दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील १ हजार २२५ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली. तसंच राज्यात सध्या ३८ हजार ४९३ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच आज मृत्यू झालेल्यांमध्ये ६८ पुरूष आणि ३५ महिलांचा समावेश आहे. तर ५९ रुग्ण हे ६० वर्षे आणि उर्वरित ३९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील होते, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली.

दरम्यान, राज्यातील रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ४३.३३ टक्के एवढं झालं आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा ३.४ टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसंच राज्यात सध्या ५ लाख ७० हजार ४५३ जण होम क्वारंटाइन आहेत. राज्यातील संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये ७२ हजार ५३८ बेड्स उपलब्ध असून सध्या ३५ हजार ०९७ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 9:37 pm

Web Title: maharashtra coronavirus live update patients numbers increased by 2287 and 103 death health minister rajesh tope jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 गडचिरोली: करोनाची लागण झालेल्या सिरोंचा येथील रुग्णाचा हैद्राबादमध्ये मृत्यू
2 परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावरून राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले…
3 पुणे-सातारा महामार्गावर ड्युटी बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण
Just Now!
X