राज्यात सध्या करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. आज दिवसभरात राज्यातील करोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दिवसभरात राज्यात १ हजार २७८ नव्या करोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. तर करोनामुळे एकूण ५३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दिवसभरात राज्यात १ हजार २७८ करोनाग्रस्तांची नोद झाली असून करोनामुळे ५३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यानंतर राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या २२ हजार १७१ वर पोहोचली आहे. तसंच दिवसभरात ३९९ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसंच आतापर्यंत ४ हजार १९९ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.

शनिवारी राज्यात १ हजार १६५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तसंच ३३० करोनाग्रस्तांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती.