राज्यात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक असून आजही राज्याचा रिकव्हरी रेट ९५.२८ टक्के इतका आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज २ हजार ७७१ नवे करोनाबाधित रूग्ण आढळले. तर २ हजार ६१३ करोनाबाधित रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे एकूण १९ लाख २५ हजार ८०० रुग्ण करोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. परंतु चिंतेची बाब म्हणजे राज्यात अद्याप एकूण ४३ हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

गुरूवारची आकडेवारी पाहता, राज्यात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाण ९५.२८ टक्के इतके होते. राज्यात २४ तासांत २ हजार ८८९ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर नवीन ३ हजार १८१ करोनाबाधित रुग्ण बरे झाले होते. त्यामुळे एकूण आकडा १९ लाख २३ हजार १८७ इतका होता. त्याशिवाय राज्यात एकूण ४३ हजार ०४८ अॅक्टिव्ह रुग्ण होते.