अलिबाग सत्र न्यायालयाचा निकाल

अल्पवयिन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अलिबाग सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राज जयराम कांबळे असे या आरोपीचे नाव आहे.

पनवेल शहरातील मिरची गल्ली परिसरात २३ फेब्रुवारी २०१२ पहाटे ६च्या सुमारास ही घटना घडली होती. आईवडिलांवर रागावून घरातून बाहेर पडलेली १३ वर्षांंची ही अल्पवयिन मुलगी पनवेल रेल्वेस्टेशन परिसरात भरकटली होती. तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन राज कांबळे याने तिला बळजबरीने मिरची गल्लीजवळील नाल्याजवळच्या परिसरात नेले आणि तिच्यावर  बलात्कार केला. पिडीत मुलीने यावेळी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला म्हणून तिला धमकावून मारहाणही केली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पनवेल पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम ३७६, ३४१, ३२३, ५०६ तसेच बाल लंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक डी. ए. पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल िभगार्डे यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश पेठकर यांच्या न्यायालयात सुरु होती. यावेळी सरकारी अभिव्योक्ता म्हणून अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी काम पाहिले. अभियोग पक्षातर्फे यावेळी १० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यात पिडीत मुलगी, तिचे आईवडील आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी राज जयराम कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवले. आणि बाललंगिक

अत्याचार कायद्याच्या कलम ३ व ४ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर भादवी कलम ३७६ अन्वये १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड ठोठावला.