हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून यावेळी शाब्दिक युद्धही रंगत आहे. असाचा काहीसा प्रकार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा नेते सुधीर मुनगुंटीवार यांच्यात झालेला पहायला मिळाला. यावेळी तर अजित पवारांनी सुधीर मुनगंटीवारांना मला पाडून दाखवा असं जाहीर आवाहन दिलं.

“फडणवीस योग्य भूमिका मांडत आहेत,” विधानसभा अध्यक्षांनी वाढीव वीज बिलावरुन खडसावलं

rohit pawar latest marathi news
रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याने ते अजित पवारांवर टीका करतात – सुनील शेळके
kanhaiya kumar latest marathi news
“आश्वासनांचे अपयश लपविण्यासाठीच पंतप्रधान मोदींकडून ४०० पारचा नारा”, काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांची टीका
Arvind Kejriwal aap Rajkumar Anand resigns
अरविंद केजरीवालांना मोठा धक्का, दिल्लीतल्या मंत्र्याचा राजीनामा, आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप करत म्हणाले…
Sharad Pawar Answer to Ajit Pawar
शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर, “घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते, कारण..”

झालं असं की, सुधीर मुनगंटीवार पुरवणी मागण्यांवर चर्चा करत असताना ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत होते. सुधीर मुनगंटीवार सरकारवर आरोप करत असताना अजित पवार त्यांना उत्तर देण्यासाठी उभे राहिले. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी,” माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही,” असं म्हटलं. यावर मग अजित पवारांनीही आपल्या शैलीत मी तुमचं आव्हान स्वीकारतो, मला पाडून दाखवा असं उत्तर दिलं.

“सत्ता डोक्यात जाता कामा नये,” कंगना आणि अर्णबच्या मुद्द्यावरुन फडणवीस सभागृहात आक्रमक

“तुमचा जन्म महिना तुमचे आचरण आणि कृती प्रभावित करतो असं माझ्या वाचनात आलं. अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि माझा जन्म महिना जुलै महिन्यातला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्या हातात महाराष्ट्र निश्चितपणे सुरक्षित असावा, याची मला खात्री झाली,” असा चिमटा यावेळी त्यांनी काढला.