News Flash

विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले…

"विदर्भ, मराठवाड्याच्या हिश्श्याचा एक रुपयाही कमी न करता संपूर्ण निधी देणार"

संग्रहित छायाचित्र

विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात असल्याचे गृहित धरुन निधीवाटपाच्या सूत्रानुसार अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्याला संपूर्ण निधी दिला जाईल. विदर्भ, मराठवाड्याच्या सर्वकष विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरील नियुक्त्या लवकरच करण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

“आम्ही भिकारी नाही,” फडणवीसांचा अजित पवारांवर हल्लाबोल

विधान परिषदेतील १२ आमदारांची नियुक्ती जाहीर होणेही तितकंच महत्वाचे असल्याचे सांगून या मुद्‌याकडेही उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहाचे लक्ष वेधले. विधानसभेत उपस्थित एका चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळांच्या निर्मितीसाठी राज्याने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवले असल्याची माहितीही दिली.

“तुमचं ऐकलं आता माझं ऐकून घ्या,” मुनगुटींवारांच्या प्रश्नावर अजित पवारांच उत्तर

“विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे राज्य सरकारचे ध्येय आहे. त्यासाठी विधान परिषदेसाठी राज्य सरकारने शिफारस केलेल्या सदस्यांच्या नियुक्त्याही तातडीने होणे आवश्यक आहे. विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीची घोषणाही तातडीने होणे आवश्यक,” असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांनी व्यक्त केले.

अजित पवारांचं उत्तर –
“विकास महामंडळ आम्ही स्थापन करु, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. बजेटमध्ये तसा निधी देऊ. आमचं लवकरात लवकर करायचं ठरलं आहे. पण मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु. १० नंबरी काय आणि पुढचा कोणता नंबर लावा तसं अधिवेशन करु,” असं उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिलं. अजित पवार बोलत असताना विरोधक गदारोळ घालू लागल्यानंतर तुमचं ऐकलं आता माझं ऐकून घ्या म्हणत अजित पवारांनी सुनावलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 2:58 pm

Web Title: maharashtra deputy cm ajit pawar budget session vidarbha marathwada sgy 87
Next Stories
1 “तिच्याशी लग्न करणार का?,” शाळकरी मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला सुप्रीम कोर्टाचा सवाल
2 “आम्ही भिकारी नाही,” फडणवीसांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3 अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारला घेरण्यासाठी असा आहे फडणवीसांचा प्लॅन