राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या सर्वांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गाव कारभाऱ्यांनो आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या, असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं.

“भाजपाच एक नंबरचा पक्ष”; ग्रामपंचायत निवडणूक निकालावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, “स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्वाचा घटक आहे. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे”.

ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेंचा पराभव केल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पुढे ते म्हणाले की, “स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा”.