News Flash

शिवेंद्रराजेंच्या जाहीर धमकीवर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

संपवल्याशिवाय शांत राहणार नाही अशी धमकी शिवेंद्रराजे यांनी दिली आहे

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना जाहीर धमकी दिली असून माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही असं वक्तव्य केलं आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी शशिकांत शिंदे प्रयत्न करत असून त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच शिवेंद्रराजे यांनी दिलेलं हे आव्हान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हिंदुत्व भाजपाची मक्तेदारी नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“राजकारणात कोणी कोणाला धमकी देण्यात काही अर्थ नसतो. कदाचित कार्यकर्त्यांना बरं वाटावं, ते आपल्यासोबत राहावेत यासाठी कोणीतरी काहीतरी बोललं जातं. परंतू मला त्याबद्दल काहाही माहिती नाही. त्या धमकीला घाबरण्याचं कारण नाही,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी शिवेंद्रराजेंच्या वक्तव्यावर दिली आहे.

“अमिबाला सुद्धा लाज वाटेल,” आशिष शेलारांची शिवसेनेवर खोचक टीका

शिवेंद्रराजेंनी नेमकं काय म्हटलं आहे –
“माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्यांचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही. माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार ही आपली भूमिका आहे. आपला काटा जर कोणी काढत असेल तर मग काट्याने काटा काढायचा हीच आपली भूमिका स्पष्ट आहे. याबाबतीत मी पण मागे फिरणाऱ्यातील नाही. जर कोणी आडवेपणा करत असेल तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून आलेला माणूस आहे,” असं शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.

फडणवीसांच्या टीकेला उत्तर
“ज्यावेळी केंद्र सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत त्याच्याबद्दल काही समर्थन करता येत नाही म्हणून राज्य सरकारबद्दल असं वक्तव्य केलं जातं. पेट्रोलची दरवाढ कोणाच्या हातात असते हे सर्वांनाच माहिती आहे. उलट केंद्र सरकारच्या अशा दरवाढीमुळे देशातील आणि राज्यातील लोकांना पेट्रोल १०० रुपये झालं तरी आश्चर्य वाटणार नाही. आपलं अपयश लपवण्यासाठी त्यांनी कदाचित हे वक्तव्य केलं असावं,” असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. शरजीलच्या बाबतीत सरकारने अजिबात बोटचेपी भूमिका घेतली नसल्याचं सांगत अजित पवारांनी फडणवीसांचा आरोप फेटाळला.

सेलिब्रिटींच्या ट्विटवर प्रतिक्रिया
“सेलिब्रिटींनी काय ट्विट करावं हा त्यांचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार. त्याबद्दल आम्ही टीका करण्याचं कारण नाही. पण इतकं मोठं आंदोलन होत असताना अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीही देण्यात आलेलं नाही,” असं अजित पवारांनी सांगितलं.

काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे विधानसभा अध्यक्षपद जाणार असल्याच्या वृत्तावर बोलताना ते म्हणाले की, “अशा बातम्यांमध्ये काही तथ्य नसतं. महाविकास आघाडी एक वर्षापूर्वी अस्तित्वात आली. त्यावेळी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र बसून जे निर्णय घेतले त्यांची अमलजबजावणी सगळे करत आहोत”. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर बोलताना हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 1:17 pm

Web Title: maharashtra deputy cm ajit pawar on shivendra raje statement sgy 87
Next Stories
1 हिंदुत्व भाजपाची मक्तेदारी नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
2 ‘…तर आम्ही पुन्हा येऊ’, धमकी देत 23 लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोर झाले पसार
3 “सरकारचे येथे असे काही धंदे चालतात की…”; राज्यपालांची ठाकरे सरकारवर टीका
Just Now!
X