राज्यात सध्या पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. एकीकडे भाजपा वारंवार वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना दुसरीकडे शिवसेना मात्र वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याप्रकरणावर विचारलं असता ते म्हणाले की, प्रत्येक घटनेचा तपास व्यवस्थित व्हायलाच हवा, ही भूमिका माझी सुरुवातीपासूनच आहे. पूजा चव्हाण प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. हा तपास सुरु असताना एखाद्याची चूक सिद्ध झाल्यास त्याला शिक्षा झालीच पाहिजे. या चौकशीतून लवकरच सत्य बाहेर येईल. पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

आजवर ज्या लोकप्रतिनिधीवर आरोप झाले ते लोक पदापासून बाजूला झाले त्यावर ते म्हणाले की, रेल्वे अपघातामुळे लाल बहादूर शास्त्री यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यावेळच्या घटना लक्षात घेता बाजूला झाले. आज त्यांच्याशी तुलना होऊ शकते का? त्यामुळे प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते. मी राजकारणात नसताना काही घटना आठवतात की, कोर्टाने ताशेरे जरी ओढले तरी राजीनामा दिल्याचे पाहिले आहे. पण आता काय घडते हे आपण सर्व जण पाहत आहोत.

पूजा चव्हाण प्रकरणी संबधित मंत्री नॉट रिचेबल आहेत. बोलत नाही. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या घटनेत प्रतिक्रिया दिली. आता नेमकं काय झाल त्यावर ते म्हणाले की, जेव्हा मी त्यांना भेटेल तेव्हा त्यांना सांगेल की, पत्रकार मंडळी तुमची आत्मियतेने वाट पाहत आहेत. एकादा पुढे या असे त्यांना नक्कीच सांगेल.

आणखी वाचा- विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला घाबरलो असतो, तर… – अजित पवार

पेट्रोल वाढीवर काय म्हणाले?
दिवसागणिक वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पुण्यामधील एका कार्यक्रम ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, तुम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे. झालेल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत, जेणेकरुन त्यातून नागरिकांना मदत मिळेल. पेट्रोलची किंमत १०० रुपयांपेक्षा पुढे जाईल असं म्हटलं जात होतं. प्रत्येक्षात काही राज्यात पेट्रोलनं शंभरी ओलांडली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य आणि मध्यम वर्गीय त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ही दरवाढ कमी झाली पाहिजे, ही माझीच नाही तर सर्वांचीच भावना आहे. तसेच नेहमीच पेट्रोलवरील राज्याचा टॅक्स किती आहे? त्यावर चर्चा असते. त्याबद्दल मी बजेट मांडताना नक्कीच सांगेल. तसेच हा टॅक्स कुठे वाढवणार आणि कुठे कमी करणार हेही निश्चितच सांगेल.

आणखी वाचा- दादांच्या मनात काय चाललंय हे कळलं पाहिजे म्हणून ‘ती’ भाषा शिकणार- उद्धव ठाकरे

विरोधकांवर टीका –
हे सरकार तीन महिने चालेल, सहा महिने चालेल असे म्हणतात, सारखे तीन महिने विरोधक वाढवित आहेत. आता सरकारला सव्वा वर्ष झाले आहे. त्यामुळे आमच्या सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज पूर्ण करेल, सर्व एकोप्याने काम करीत आहे, असेही पवार म्हणाले.