बेळगाव आणि इतर मराठी भाषिक भुभागासाठी लढा देणारी महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावात १९९९ पासून सातत्याने जिंकत आली आहे. मात्र, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावादाचा मुद्दा यंदाच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मागे पडला आहे. त्यामुळे ते आता यापुढे बेळगावातून जिंकू शकणार नाहीत, असे बेळगाव जिल्हा कन्नड कृत समितीचे अध्यक्ष अशोक चांदरगी यांनी म्हटले आहे.
As far as the border dispute (Belagum on Karnataka -Maharashtra border) is concerned it has lost its relevance in the present election. Till '99, Maharashtra Ekikaran Samiti won from here, but not anymore: Ashok Chandargi, President, Belgaum District Kannada Actions Committee pic.twitter.com/83KQBXoWR6
— ANI (@ANI) May 2, 2018
सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. यावेळी राज्यातील विविध मुद्दे या निवडणुकीच्या प्रचारात घेतले जात आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत आजवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दाही ऐरणीवर असायचा. मराठी भाषिकांवर बेळगावात अन्याय होत असल्याची भुमिका कामच महाराष्ट्र एकीकरण समितीने मांडली आहे. त्यामुळे मराठीबहुल या जिल्ह्यात गेल्या १८ वर्षांपासून समितीचेच वर्चस्व राहिले आहे. बेळगावच्या महापालिकेतही समितीचीच सत्ता आहे. मात्र, यंदा महाराष्ट्र एकीकरण समितीत फुट पडल्याने हा गड ढासाळल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत बेळगावचा मुद्दा प्रचारात नाही. बेळगावसह सर्व मराठी भाषिकांचा प्रदेश महाराष्ट्रात यावा याला शिवसेनेचा पाठींबा आहे. तर, यंदा भाजपाने राज्य काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेसही तयारीत आहे. मात्र, त्यामुळे सीमावादाचा मुद्दा मागे पडल्याचे चित्र आहे.
How is the border issue relevant in this election? India is one, there is no question of border. We are going to win all 18 seats in Belgaum. Congress is playing pity politics: BJP MP from Belgaum Suresh Angadi #KarnatakaElections2018 pic.twitter.com/ajMCVeLJ0K
— ANI (@ANI) May 2, 2018
भारत एक अखंड देश असल्याने येथे अंतर्गत सीमांचा वाद नाही, त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत सीमावादाचा मुद्दा कसा येऊ शकतो? असा सवाल करीत काँग्रेस हा मुद्दा उपस्थित करुन घाणेरडे राजकारण करीत असल्याचा आरोप बेळगावचे भाजपाचे खासदार सुरेश अंगाडी यांनी केला आहे. तसेच यंदा आम्ही येथील सर्वच्या सर्व १८ जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तर, महाराष्ट्र कर्नाटकातील ८६५ गावांसाठी लढत आहे. यांपैकी २२४ गावांच्या महाराष्ट्रातील समावेशासाठी आम्ही तयार आहोत. मात्र, बेळगावची सुपीक जमीन कर्नाटकला सोडायची नाही. सीमावादामुळे या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा विकास झालेला नाही. तसेच केंद्र सरकारला हा वाद सोडवायचा नाही, असा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीचे किरण ठाकूर यांनी केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2018 10:17 pm