News Flash

वीज ग्राहकांना दिलासा! १ एप्रिलपासून वीज दरात २ टक्के कपात

वीज नियामक आयोगाचा निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

करोना संकट, लॉकडाउन आणि आता वाढत्या इंधन व गॅस दराने हैराण असलेल्या सर्वसामान्यांना वीज नियामक आयोगानं मोठा दिलासा दिला आहे. मागील काही दिवसांपासून वीज बिलाचा मुद्दा चर्चेत असतानाच हा निर्णय घेण्यात आला असून, वीज दरात जवळपास २ टक्के कपात करण्याचे आदेश आयोगाने वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत. ही दर कपात १ एप्रिलपासून लागू केली जाणार आहे.

राज्य वीज नियामक आयोगानं दर कपातीचा निर्णय घेतला असून, तसे आदेश वीज वितरण कंपन्यांना दिले आहेत. वीज नियामक आयोगानं इंधन समायोजन कर (एफएसी) फंडाचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश वीज कंपन्यांना दिले आहेत. आयोगाच्या आदेशानुसार महावितरण, बेस्ट, टाटा, अदाणी या वीज कंपन्यांच्या वीज दरात सरासरी २ टक्क्यांची केली जाणार आहे.

आणखी वाचा- “फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच १ एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज”

राज्य वीज नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी राज्यातील वीज ग्राहकांचे वीजदरही निश्चित केले आहेत. आयोगाने पुढील पाच वर्षांसाठीच्या वीज दर जाहीर केले. या निर्णयानुसार महावितरणच्या घरगुती वीजबिलात १ टक्के कपात केली आहे. त्यामुळे युनिटमागे ग्राहकांना ७.५८रुपये द्यावे लागणार आहे. अदाणी कंपनीची वीज घेणाऱ्या ग्राहकांना ०.३टक्के वाढ लागू केली असून, प्रत्येक युनिटसाठी ग्राहकांना ६.५३ रुपये मोजावे लागणार आहे. तर बेस्टच्या ग्राहकांना ०.१ टक्के वाढीनुसार युनिटमागे ६.४२रुपये द्यावे लागणार आहे. टाटा पॉवरच्या वीजदरात १ एप्रिलपासून ४.३ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. आयोगाने दरवाढीला मंजुरी दिली असून, ‘टाटा’च्या ग्राहकांना प्रति युनिट ५.२२ रुपयांची अधिकची झळ बसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 12:40 pm

Web Title: maharashtra electricity bill update power tariff reduce by 2 percent bmh 90
Next Stories
1 “…त्याचीच किंमत तापसी, अनुरागला चुकवावी लागतेय”
2 लसीकरणासाठी ज्येष्ठांची १५ किलोमीटर पायपीट
3 डोंगर-टेकडय़ांना पुन्हा हिरवा साज
Just Now!
X