News Flash

महाराष्ट्र एक्सप्रेस आता मध्य प्रदेश एक्सप्रेस?

महाराष्ट्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेस मध्य प्रदेश एक्सप्रेस होण्याची शक्यता आहे.

पश्चिम-मध्य रेल्वेच्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र एक्सप्रेस आणि इतवारी ते रिवा एक्सप्रेस (आठवडय़ातून तीन) या दोन गाडय़ांची सेवा एकत्रित करण्यात येणार आहे.

पश्चिम-मध्य रेल्वेचा प्रस्ताव

नागपूर : कोल्हापूरहून निघून जवळपास संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालून विदर्भातील गोंदियापर्यंत धावणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसला मध्य प्रदेशातील जबलपूर आणि रिवापर्यंत सोडण्याची योजना दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने तयार के ली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेस मध्य प्रदेश एक्सप्रेस होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूर ते बालाघाट आणि गोंदिया दरम्यानचे ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर नागपूर (इतवारी) ते रिवा एक्सप्रेस आठवडय़ातून तीन दिवस धावत आहे. ही गाडी बंद करून गोंदियाहून कोल्हापूरसाठी निघणारी महाराष्ट्र एक्सप्रेसला रिवापर्यंत नेण्याचा प्रस्ताव पश्चिम-मध्य रेल्वेने तयार केला आहे. यापूर्वी महाराष्ट्र एक्सप्रेस नागपूर ते पुणे अशी होती. त्यानंतर कोल्हापूर ते गोंदिया असा विस्तार झाला. नव्या प्रस्तावानुसार रिवापर्यंत ही गाडी नेल्यास तिचा १ हजार ८१७ किलोमीटरचा प्रवास होणार आहे. जम्मूतवी एक्सप्रेसच्या खालोखाल हे अंतर आहे. मध्य प्रदेशातून सुमारे ५०० किलोमीटर आणि उर्वरित अंतर ही गाडी महाराष्ट्रातून पार करेल. के वळ महाराष्ट्रातून धावणारी गाडी म्हणून महाराष्ट्र एक्सप्रेस असे नाव तिला आहे. आता मध्य प्रदेशातून ही धावणार असल्याने नाव बदलणार काय, असा सवाल प्रवासी संघटनांनी के ला आहे.

दरम्यान, पश्चिम-मध्य रेल्वेच्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र एक्सप्रेस आणि इतवारी ते रिवा एक्सप्रेस (आठवडय़ातून तीन) या दोन गाडय़ांची सेवा एकत्रित करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे महाराष्ट्र एक्सप्रेस चालवत आहे. यासाठी चार गाडय़ा (रेक) लागतात. या गाडीची प्राथमिक देखभाल दुरुस्ती कोल्हापूरला होत आहे. रिवा ते इतवारी-रिवा (तीन दिवस) एका रेकने धावत आहे. रेल्वे बोर्डाने एक्सप्रेस दोन रेक देण्याचे आणि ही गाडी दररोज सोडण्यास मान्यता दिली आहे. नव्या प्रस्तावासह रेल्वेचे अंदाजित वेळापत्रकही तयार केले आहे. असे के ल्यास गोंदियाला महाराष्ट्र एक्सप्रेसला १२ तास थांबून राहावे लागणार नाही. तसेच रिवा, जबलपूरच्या प्रवाशांचा थेट नागपूर आणि पुणे असा प्रवास शक्य होईल. त्यामुळे १०० कोटींचे दोन रेक (गाडय़ा) बचत होईल. शिवाय २० कोटींचे एक इंजिन अन्यत्र वापरात येणार आहे, असेही प्रस्तावात म्हटले आहे.

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसचा विस्तार मध्य प्रदेशातील जबलपूर-रिवापर्यंत करण्याचा प्रस्ताव आहे. त्यास रेल्वे बोर्डाची मान्यता मिळाली नाही.

साकेत रंजन, मुख्य जनसंपर्क अधिकारी, दक्षिण- पूर्व- मध्य रेल्वे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 12:03 am

Web Title: maharashtra express now madhya pradesh express zws 70
Next Stories
1 वर्धा जिल्ह्यासाठी शासनाकडून मिळाल्या ११ रूग्णवाहिका; ग्रामीण भागातील रूग्णांना होणार फायदा!
2 COVID 19 : राज्यात दिवसभरात १४ हजार ४३३ रूग्ण करोनामुक्त, रिकव्हरी रेट ९५.५ टक्के!
3 करोनाच्या लसीसाठी मोदी सरकारने निधी कमी पडू दिला नाही – विक्रांत पाटील
Just Now!
X