News Flash

गडकरीकडून महाराष्ट्राला रिटर्न गिफ्ट; सात हजारांचं इंजेक्शन १२०० रुपयांना मिळणार

वर्ध्याच्या जेनेटीक लाइफ सायन्समध्ये होणार निर्मिती

फोटो सौजन्य- Office Of Nitin Gadkari ट्विटर

महाराष्ट्राच्या वर्धा येथील जेनेटीक लाइफ सायन्स येथे एम्फोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शन तयार करण्यास सुरवात केली आहे. हे म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी वापरले जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार याची किंमत प्रत्येकी १,२०० असणार आहे.

विशेष म्हणजे आज नितीन गडकरी यांचा वाढदिवस देखील आहे. अशातच गडकरींनी हे रिटर्न गिफ्ट दिलं आहे. गडकरींनी ब्लॅक फंगसवरील इजेक्शन बाजारात आणलं आहे. आतापर्यंत सात हजार किंमत असणारं हे इंजेक्शन आता १२०० रुपयात मिळणार आहे. देशात एम्फोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शनचं उत्पादन आतापर्यंत एकाच कंपनीतर्फे करण्यात येत होतं. आता वर्ध्याच्या जेनेटीक लाइफ सायन्सलादेखील याची निर्मिती करता येणार आहे. सोमवारपासून हे विक्री साठी बाजारात उपलब्ध होणार आहे.

म्युकोरमायकोसिस उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या एम्फोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शनच्या २९,२५० अतिरिक्त कुपी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांनी बुधवारी दिली होती.

नक्की वाचा>> मोदी 2.0 सरकार सर्वेक्षण : अबकी बार गडकरी… पंतप्रधान म्हणून महाराष्ट्राच्या मनात गडकरीच

दरम्यान, देशात करोनाचं संकट कमी होत असताना म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसने डोकं वर काढलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. देशभरात एकूण ११ हजार ७१७ जणांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे गुजरात आणि महाराष्ट्रात असल्याचं दिसून आलं आहे. ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य मंत्रालयानेही चिंता व्यक्त केली आहे. यासाठी अनेक राज्यांनी ब्लॅक फंगसला साथीचा आजार घोषित केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 5:26 pm

Web Title: maharashtra firm begins black fungus drug production each vial to cost 1200 abn 97
Next Stories
1 आरोग्य विभागाच्या मानसेवी डॉक्टरांनी मागितली मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची परवानगी!
2 “महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल,” चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक विधान
3 “मराठा आरक्षणाबाबत भाजपाचा कळवळा केवळ दिखावा”, अशोक चव्हाणांची टीका
Just Now!
X