24 September 2020

News Flash

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं निधन

१९८५ ते ८६ या कालावधीत भूषवलं होतं मुख्यमंत्रीपद

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं आज पाहाटे पुण्यातील रुग्णालयात निधनात झालं. आज पहाटे किडणीच्या आजारानं त्यांचं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाल्याची माहितीही समोर आली होती. परंतु त्यांनंतर त्यांनी करोनावर मातही केली होती.

राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं आज पहाटे पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना किडनीच्या आजारानं निधन झालं. काही दिवसांपूर्वी त्यांनी करोनावर मातही केली होती. त्यानंतर त्यांना नॉन करोना वॉर्डमध्येही हलवण्यात आलं होतं. १९८५ ते ८६ या कालावधीत त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. तसंच राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचा कार्यभारही सांभाळला होता. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू आहेत.

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचाजन्म ९ फेब्रुवारी १९३१ रोजी नणंद येथे झाला. त्याचं शालेय शिक्षण गुलबर्गा येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण हैद्राबाद व पिछाडी पर्यंत नागपूरात झाले. १९६२ पासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत पार पाडल्या. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, एक मुलगी, नातू आणि पणतू असा मोठा परिवार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 7:51 am

Web Title: maharashtra former chief minister shivajirao patil nilangekar passes away jud 87
Next Stories
1 पालघर जिल्ह्याला पावसाचा तडाखा
2 अनुदानित युरियाचा काळाबाजार
3 शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नभोवाणी, दूरचित्रवाणीचा आधार
Just Now!
X