News Flash

चाराटंचाई निवारणासाठी आणखी २२ कोटींचा प्रस्ताव

जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या ८३ चारा छावण्यांमध्ये ७० हजार ७६ जनावरे दाखल आहेत.

जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या ८३ चारा छावण्यांमध्ये ७० हजार ७६ जनावरे दाखल आहेत. चारा छावणीवर प्रशासनाकडून आतापर्यंत ९ कोटी ९८ लाख रुपये खर्च करण्यात आले. भविष्यात चाराटंचाईचा प्रश्न उद्भवणार असल्याने जिल्हा प्रशासनाने आणखी २२ कोटी २३ लाख निधी मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. चाऱ्याचा प्रश्न उद्भवल्यास ठाणे, पालघर व सोलापूर जिल्ह्यांतून गवत व कडबा खरेदी करून जनावरांची भूक भागवली जाणार आहे. मागील सलग ४ वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे रब्बी हंगामात उपलब्ध होणारा कडबा केवळ दोन लाख मेट्रिक टन आहे. इतका चारा १५ दिवससुद्धा पुरणार नाही. त्यामुळे ज्या पशुपालकांकडे कडबा नाही, अशा पशुपालकांना जनावरे कवडीमोल कि मतीत विकण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात लहान-मोठी ७ लाख ३७ हजार ४४७ जनावरे आहेत. या जनावरांना दररोज ३ हजार २५ मेट्रिक टन, तर दरमहा ३ हजार २५ मेट्रिक टन चाऱ्याची गरज आहे. परंतु जिल्ह्यात मागील ४ वर्षांपासून नापिकीमुळे चारा उपलब्ध झाला नाही.
परिणामी जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाख जनावरांना सरकारने सुरू केलेल्या ८३ छावण्यांमुळे आधार मिळाला आहे.
या चारा छावणी चालकाकडून मिळेल तेथून उसाचा चारा उपलब्ध करुन जनावरांची भूक भागवली जात आहे. दुष्काळात चारा छावण्यांचा जनावरांना आधार मिळाला असताना सरकारकडून छावणी चालकांची मात्र परवड सुरू आहे. त्यांना वेळेत निधी उपलब्ध करुन देणे आवश्यक असताना विलंब लावला जात आहे. त्यामुळे दुष्काळाबद्दल सरकार गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी सरकारच्या जाचक अटी असताना पुढाकार घेऊन लाखो रुपये खर्चून चारा छावण्या उभ्या केल्या, तेथे चाराही उपलब्ध केला. परंतु चारा छावण्या सुरू झाल्यापासून पहिल्या वेळीही सरकारकडून त्यांना निधी देण्यात विलंब झाला होता. या बाबत छावणी चालकाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनेही दिली. त्यावर सरकारकडून थकीत अडीच कोटींचा निधी देण्यात आला. मात्र, त्यावेळची रक्कम केवळ अडीच कोटी होती.
जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात चारा छावण्यांची संख्या कमी होती. ती हळूहळू वाढत तब्बल ८३ चारा छावण्या चालू झाल्या. आजपर्यंत या चारा छावण्यांची ९ कोटी ९८ हजार इतकी देयके संबंधित तहसील कार्यालयाकडे अदा करण्यात आली.
भविष्यात चाराटंचाई तीव्र होऊ नये, या साठी जिल्हा प्रशासनाने पालघर, ठाणे व सोलापूर जिल्ह्यातून चारा खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2016 1:37 am

Web Title: maharashtra gets investment proposals worth rs 22 crore
Next Stories
1 अल्पवयीन मुलीचा खून आणि बलात्कार
2 पर्ससीनवरील बंदीमुळे खलाशी माघारी जाण्यास सुरुवात
3 आदेश न मानणाऱ्या रक्षकांवर कारवाई?
Just Now!
X