03 June 2020

News Flash

धक्कादायक! महाराष्ट्राच्या सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या

गेल्याच महिन्यात मिळवलं होतं सुवर्णपदक

महाराष्ट्राचा सुपुत्र आणि सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत याने अकोला येथे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अकोला येथील शास्त्री स्टेडियम जवळ असलेल्या ‘क्रीडा प्रबोधनी’मध्ये त्याने गळफास लावून घेतला. नुकत्याच दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. त्यामुळे त्याच्या आत्महत्येबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दिल्लीमध्ये जानेवारी महिन्यात राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धांमध्ये प्रणवने सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर त्याची फारशी चर्चा झाली नाही. मात्र शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास प्रणवने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. तो शास्त्री स्टेडियममधील रुम मधून बाहेर आला नाही, म्हणून त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला. दरवाजा आतून बंद होता. खूप वेळा दरवाजा वाजवूनही दरवाजा उघडला नसल्याने अखेर त्याच्या मित्रांनी दरवाजा तोडला. त्यावेळी प्रणवने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले.

प्रणवच्या वागण्यात कालपर्यंत काहीही वेगळेपणा जाणवत नव्हता, असे त्याच्या मित्रांकडून समजले. त्याच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून तो कोणत्याही तणावात किंवा दबावात असल्याचे वाटले नाही, असे त्याच्या प्रशिक्षकांनीही सांगितले. पण वयाच्या २२ व्या वर्षी प्रणवने अचानक आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत, पण आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 1:29 pm

Web Title: maharashtra gold medalist boxer pranav raut commits suicide vjb 91
Next Stories
1 T20 WC 2020 Ind Vs Aus : पूनमच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाचे लोटांगण; भारताची विजयी सलामी
2 भारताच्या स्टार फिरकीपटूचा क्रिकेटला अलविदा
3 Ind vs NZ : वेलिंग्टनमध्ये भारतीय फलंदाजांची दैना, मराठमोळ्या अजिंक्यने सांभाळला गड
Just Now!
X