News Flash

महाड दुर्घटनेतील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना सरकारकडून १० लाखांची मदत

मुंबई-गोवा महामार्गावर महाड एमआयडीसीजवळील पूल कोसळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने गुरुवारी अपघातामध्ये बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना

मुंबई-गोवा महामार्गावर महाड एमआयडीसीजवळील पूल कोसळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने गुरुवारी अपघातामध्ये बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना सरकार दहा लाख रुपयांची मदत करणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटले आहे.  तसेच अपघातातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसाला नोकरी किंवा दहा लाख रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन विधानसभेत दिले होते. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथे रेकॉर्डब्रेक वेळेत नवा पूल बांधण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 5:13 pm

Web Title: maharashtra government announces rs 10 lakh mahad bridge collapse incident
Next Stories
1 महाड दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी, रेकॉर्डब्रेक वेळेत नवा पूल बांधू – मुख्यमंत्री
2 ‘लोकसंख्या जास्त झाल्याने आपल्याकडे माणसांच्या मरणाची किंमतच राहिलेली नाही’
3 उद्धव आणि जयदेव यांच्यातील वादात पडायचे नाही – राज ठाकरे
Just Now!
X