03 December 2020

News Flash

शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटींचं पॅकेज जाहीर; दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत वेतन

परिवहन मंत्र्यांची माहिती

संग्रहीत

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वीच देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातील घोषणा केली. तसंच शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटी रूपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

“एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली होती. आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबतही बैठक पार पडली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर तोडगा काढण्यात आल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. शासनाकडून एसटीसाठी पुढील सहा महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

“टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. शासनाकडून ही आता आर्थिक मदत मिळाल्याने एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे,” असंही परब यांनी नमूद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 2:37 pm

Web Title: maharashtra government approved one thousand crore package for state transport employees will ger 3 moths salary before diwali jud 87
Next Stories
1 अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
2 जमिनी विकून चार दिवस बीएमडब्ल्यूमध्ये फिराल, पुढे काय?; महसूलमंत्र्यांचा सवाल
3 दुचाकी-चारचाकींच्या क्रमांक पाटय़ांवरील ‘दादा-भाई’गिरीत वाढ
Just Now!
X