b  येत्या १ जून ते ३१ जुलै या कालावधीत यांत्रिकी नौकांद्वारे खोल समुद्रात मासेमारी करण्यास शासनाने बंदी घातली आहे.

पावसाळ्याच्या काळात खोल समुद्रात मुसळधार लाटा आणि वारा सुरू असतो, तर पावसाळ्याच्या याच काळात सुरुवातीच्या महिन्यात समुद्री मासे प्रजनन करतात. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांसाठी सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मलांपर्यंत  खोल समुद्रातील यांत्रिकी मासेमारी बंद घालण्यात येते.

१ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारीस बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी यांत्रिक मासेमारी नौकांसाठी आहे.  १ ऑगस्टपासून मासेमारीला पुन्हा सुरुवात करण्यात येईल.

ही बंदी यांत्रिक मासेमारी नौकांसाठी आहे. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांसाठी बंदी लागू नाही, असे मत्स्य विभागने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

बंदी काळात सागरी जलाधी क्षेत्राबाहेर म्हणजेच १२ सागरी मलांपर्यंत खोल समुद्रात यांत्रिक मासेमारी नौका मासेमारी करताना आढळल्यास गलबत तसेच पकडलेले जप्त करण्यात येतील. गलबताच्या मालकावर कठोर कारवाई करण्यात येईल.

‘पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस नुकसानभरपाई शासनाकडून मिळणार नाही.’

– अभयसिंह शिंदे इनामदार, साहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड</strong>