News Flash

पाच दिवसांच्या आठवड्याचे नियम जाहीर; सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळ वाढली

जेवणासाठी 'एवढा' वेळ, शिपायांच्या वेळेतही बदल

(सांकेतिक छायाचित्र)

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने जाहीर केल्यानंतर आता त्याच्या नियमांचा जीआर (शासन निर्णय) २४ फेब्रुवारी रोजी काढण्यात आला आहे. त्यात पाच दिवसांचा आठवडा कोणास लागू नसेल हे तर स्पष्ट केलेले आहेच, शिवाय पाच दिवसांचा आठवडा लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळही निश्चित करण्यात आली आहे.

१. दिनांक २९ फेब्रुवारी, २०२० पासू शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येत असून त्यामुळे सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असतील.

२. सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी वाढवण्यात येत असून ती सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहील.

३. तसेच सर्व शासकीय कार्यालयांतील शिपायांसाठी कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.३० ते सायांकाळी ६.३० अशी राहील.

४. या कायालयीन वेळेमध्ये दिनांक ४ जून, २०१९ च्या शासन पदरपत्रकानुसार दुपारी १.०० ते २.०० या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी अंतर्भुत असेल.

५. ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम लागू आहे किंवा औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे किंवा ज्याांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात, अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार इ. यांना पाच दिवसांच्या आठवड्याबाबतचे आदेश लागू राहणार नाहीत.

अशा प्रकारच्या कार्यालयांची यादीही सरकारने दिली आहे. या यादीत दिलेल्या प्रकरात मोडणाऱ्या इतर कार्यालयांनासुद्धा पाच दिवसांचा आठवडा लागू राहणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 1:03 pm

Web Title: maharashtra government employees five day week rules gr pkd 81
Next Stories
1 अर्थसंकल्पीय अधिवेशन : सरकारची फसवणुकीची मालिका सुरुच – फडणवीस
2 ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर शिवसेनेची टीका
3 दोन वर्षांपासून दीडशेंवर मृतांच्या अवयवांचे नमुने पडून
Just Now!
X