12 August 2020

News Flash

करोना संदर्भातील चाचण्या, किटचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राजेश टोपे (संग्रहित)

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने करोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपीड अँटी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या किटचा अभ्यास करून समितीला दहा दिवसांच्या आत शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, प्रा. डॉ. अमिता जोशी हे समितीतील सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत. या संदर्भात शनिवारी आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर करण्यात आला.

समितीची कार्यकक्षा

आयसीएमआरने रॅपीड अँटी बॉडी चाचण्यांसाठी शिफारस केलेल्या विविध चाचणी प्रणाली, किट यांचा अभ्यास करून त्यापैकी सर्वच अथवा निवडक चाचणी प्रणालीचा आणि किटचा राज्यात वापर करण्याची शिफरस करण्याची जबाबदारी या समितीकडे असेल. या चाचण्या पोलीस, आरोग्य सेवेशी निगडीत संवर्ग, स्वच्छता कामगार तसेच सामान्य जनता यांच्यावर करायच्या की निवडक संवर्गावर करायच्या, याबाबत ही समिती शिफारस करेल. या बरोबरच शिफारस केलेल्या चाचण्या व किटच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वारस्य (EOI) मसुदा तयार करून आरोग्य विभागाला तो सादर करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 7:21 pm

Web Title: maharashtra government formed a committee to study rapid antibodies test and corona kit says minister rajesh tope vjb 91
Next Stories
1 राज्यातील करोनामुक्त रुग्णांची संख्या दीड लाखाच्या उंबरठ्यावर
2 मुंबई, ठाणे, कोकणासह राज्यात उद्यापासून चार दिवस दमदार पावसाची शक्यता
3 शरद पवारांची मुलाखत म्हणजे ‘नुरा कुस्ती’, मॅच फिक्सिंग; फडणवीसांचा टोला
Just Now!
X