राज्यात करोनाचा कहर वाढत असताना ठाकरे सरकार पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचा विचार करत आहे. करोनाचा प्रसार वाढू नये यासाठी सध्या राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले असून वीकेण्ड लॉकडाउनही लावला आहे. आरोग्य विभागाकडून वारंवार लोकांना मास्क लावण्याचं तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन केल आहे. पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढल्याने सणांवरही निर्बंध आले आहेत. यामुळे मंगळवारी होणार गुढीपाडवा सणावरदेखील करोनाचं सावट असून ठाकरे सरकारकडून नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सोनेखरेदीचा पाडव्याचा मुहूर्त यंदाही वाया?
पाडव्याच्या कमाईचे स्वप्न टाळेबंदीमुळे चक्काचूर

Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
arrest
रंग लावण्यासाठी अल्पवयीन मुलीला घरातून खेचून आणले; विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत आरोपीला अटक
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण

राज्य सरकारने गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर नियमावली प्रसिद्द केली आहे. नियमांचं पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. नियमावलीनुसार, सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणं अपेक्षित आहे. कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी असणार आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असं सांगण्यात आलं आहे.

व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा फटका
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहूर्तावर आवर्जून सोनेखरेदी केली जाते, परंतु करोना निर्बंधांमुळे सराफी पेढ्या बंद ठेवाव्या लागणार असल्याने व्यापाऱ्यांनी ऑनलाइन खरेदी, दूरचित्र संवाद माध्यमातून विक्रीचे पर्याय अमलात आणले आहेत, परंतु सोने ऑनलाइन खरेदी करण्याची मानसिकता नसल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरात सण, सोने खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सुवर्ण विक्रीची संधी सराफ बाजाराला साधता आली नाही. सोन्याचे दर काही दिवसांपासून कमी होऊ लागले आहे. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची व्यापाऱ्यांना आशा होती. मात्र बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अनेक व्यापारी ऑनलाइन पद्धतीने किंवा दूरचित्र संवाद माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. समाजमाध्यमांवर जाहिराती देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. सोन्यासह अन्य मौल्यवान धातूंचे दागिने आणि वस्तू विक्रीतील काही मोठ्या बँ्रड्सनी ऑनलाइन खरेदीचा पर्याय ग्राहकांना दिला आहे.