07 March 2021

News Flash

विजया रहाटकर यांची पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

महिलांवरच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम विजया रहाटकर यांनी आत्तापर्यंत केलं आहे

फोटो सौजन्य- ANI

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची पुन्हा एकदा याच पदावर नेमणूक करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील. महाराष्ट्र सरकारने विजया रहाटकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली आहे.

विजया रहाटकर यांनी महिला अध्यक्षपदी असताना महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं आहे. आता पुन्हा एकदा त्याच प्रकारे त्या काम करतील अशी अपेक्षा आहे. मागील वर्षीच्या मे महिन्यात विजया रहाटकर यांनी सोशल मीडियावर मुलींची होणारी बदनामी, छळवणूक रोखण्यासाठी सायबर समितीची स्थापना केली. मुलींना-महिलांना लक्ष्य केल्या जाणाऱ्या प्रकरणांचा अभ्यास करून अशा प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी ही समिती काम करते आहे. अशा अनेक गोष्टी त्यांनी आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत केल्या आहेत त्यामुळे त्यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्निवड करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 8:08 pm

Web Title: maharashtra government has reappointed vijaya rahatkar as the chairperson of the state womens commission for three years
Next Stories
1 आघाडीच्या संयुक्त सभेत शरद पवार काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष
2 धनंजय मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार जाहीर
3 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत पाणी न मिळाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू ?
Just Now!
X