07 March 2021

News Flash

पेट्रोल-डिझेल  दोन रुपयांनी महाग

महसूल वाढण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

महसूल वाढण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय * दरमहा ३०० कोटींचा लाभ

टाळेबंदी झाल्याने महसुलाअभावी निर्माण झालेली आर्थिक पोकळी भरून काढण्यासाठी राज्य सरकारने आता पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी वाढविले आहेत.  महसुलासाठी पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित करात प्रति लिटर प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून (१ जून) राज्यात मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत सर्वत्र पेट्रोल व डिझेल दोन रुपयांनी महाग होणार असून या दरवाढीमुळे पुढील १० महिन्यांत राज्य सरकारला तीन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल.

देशभरात २५ मार्चपासून टाळेबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. उद्योग-व्यवसाय, वाहतूक सर्वच आर्थिक व्यवहारांना त्यामुळे फटका बसल्याने राज्याच्या तिजोरीत पडणारा महसूल आटला. यामुळे राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांची गरज निर्माण झाली होती. वस्तू व सेवाकरामुळे राज्य सरकारच्या हातात करवाढीसाठी फारसे उपाय उरलेले नाहीत. त्यामुळे वित्तविभागाने हा निर्णय घेतला.

महसूल गणित..

राज्यात दरमहा सरासरी ११ लाख ६६ हजार किलोलिटर पेट्रोल व डिझेलची विक्री होते. एक किलोलिटर म्हणजे एक हजार लिटर. म्हणजेच राज्यात दरवर्षी सुमारे १ कोटी ३९ लाख ९२ हजार किलोलिटर पेट्रोल-डिझेलची विक्री होते. २०१९-२० मध्ये राज्य सरकारला पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करातून एकूण २४ हजार ९०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

राज्याला महसुलाची गरज असल्याने पेट्रोल व डिझेलवरील करात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या करवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात दरमहा ३०० कोटी रुपयांची वाढ होईल. या आर्थिक वर्षांतील एप्रिल व मे हे दोन महिने गेल्यामुळे आता पुढील १० महिन्यांत तीन हजार कोटी रुपये करवाढीतून अतिरिक्त मिळतील.

      – मनोज सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 4:00 am

Web Title: maharashtra government hike petrol diesel rate by rs 2 zws 70
Next Stories
1 सुक्या मासळीचा बाजार धोक्यात..
2 Coronavirus : जळगाव जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या ६२१
3 Coronavirus : रत्नागिरी जिल्ह्य़ात करोनामुळे मृतांची संख्या ६, एकूण रूग्ण २५६
Just Now!
X