देशातील नागरिकांना पेट्रोल-डिझेल दरवाढीपासून अजूनही दिलासा मिळताना दिसत नाही. परंतु, कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकारने राज्यातील जनतेला अल्पसा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रत्येकी २ रूपये प्रति लिटरची कपात केली आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे.

कर्नाटकमधील सरकारने इंधनाचे दर कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार इंधनाचे दर कधी कमी करणार असा सवाल मुंडे यांनी ट्विटवरून केला आहे. या ट्विटमध्ये मुंडे म्हणतात, ‘राजस्थान, आंध्रप्रदेश पाठोपाठ शेजारच्या कर्नाटक राज्यानेही पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सरकार असा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेला कधी दिलासा देणार आहे. गणपती बप्पा सरकारला असा निर्णय घेण्याची सुबुद्धी दे रे!’ या ट्विटमध्ये मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टॅगही केले आहे.

 

मुंडेंच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत इंधन दरवाढीवर महाराष्ट्र सरकारने खरच काहीतरी निर्णय घेऊन सामान्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचा सूर लावत सरकारी धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जाणून घेऊयात काय म्हणाले आहेत नेटकरी मुंडेंच्या या ट्विटवर…

वन नेशन वन टॅक्सचं काय झालं?

 

अभ्यासाला बाप्पाही कंटाळला असेल

 

निवडणूक जवळ आल्यावर दर कमी होतील

या राज्यांनी कमी केले इंधनाचे दर

कर्नाटकमध्ये काल म्हणजेच सोमवारी १७ सप्टेंबर रोजी पेट्रोलचे दर ८४ रुपये होते तर डिझेलचे दर ७६ होते. आजपासून हे दर दोन रुपयांनी कमी होणार आहे. याआधी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी राज्यातील इंधनाचे दर अडीच रुपयांनी कमी केले आहेत. तर पश्चिम बांगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही राज्यातील इंधनाचा दर एक रुपयांनी कमी केला आहे. राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारनेही ९ तारखेला पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या आधीच राज्य सरकारमार्फत इंधनावर लावण्यात येणारा ४ टक्के व्हॅट कमी करत जनतेला इंधन दरात प्रति लिटर अडीच रुपयांचा दिलासा देण्यात आला होता. मात्र राजस्थानमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधन दरांमध्ये कपात करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.