News Flash

Unlock 1.0 : दुकानं उघडण्यास राज्य सरकारची सशर्त परवानगी; नवी नियमावली जाहीर

केंद्राच्या नियमांचंही करावं लागणार पालन

संग्रहित छायाचित्र

लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी पूर्ण झाला. त्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउन ५ संदर्भात महत्त्वाची घोषणा केली होती. तसंच लॉकडाउन आता फक्त कन्टेन्मेन्ट झोनपुरता मर्यादित राहणार असल्याचं सांगत टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनंदेखील हळूहळू राज्यातील निर्बंध ३ जूनपासून टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना यासंदर्भातील माहिती दिली होती. दरम्यान, आता राज्य सरकारनं यासंदर्भात एक नवी नियमावली जारी केली आहे. त्यात राज्यातील दुकानं उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच केंद्र सरकारनं जाहीर केलेली नियमावलीही लागू असणार आहे.

मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्यात काही बाबींना सुट देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. राज्यातील दुकानं उघडण्याला सशर्त परवानगी देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. तसंच सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, चालणे यासाठी आता कोणतेही निर्बंध नसतील असं स्पष्ट करण्यात आलं होतं. तसंच बीच, सरकारी-खासगी मैदानं, सोसायट्यांचे मैदानं, गार्डन अशा ठिकाणी आता आरोग्याच्या दृष्टीने व्यायामासाठी सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉक यांना परवानगी असेल. पण हे केवळ सकाळी ५ ते संध्याकाळी ७ याच काळात करता येईल, असंही सांगण्यात आलं होतं. दरम्यान आता यासंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

आणखी वाचा- #MissionBeginAgain: ठाकरे सरकारकडून ‘या’ सहा गोष्टींवरील निर्बंध शिथील

राज्यातील दुकानं ऑड इव्हन तत्त्वावर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रस्त्याच्या एका बाजूची दुकानं एका दिवशी तर दुसऱ्या बाजूची दुकानं दुसऱ्या दिवशी खुली ठेवण्याला परवानगी देण्यात आली आहे. तसंच याची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यासाठी पालिकांचे आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांचादेखील या प्रक्रियेत सहभाग असणार आहे. तसंच ते मार्केट आणि दुकान मालकांच्या असोसिएशनच्यादेखील संपर्कात राहणार आहे. दुकानांमध्ये खरेदीला जाताना सोशल डिस्टन्स आणि अन्य मार्गदर्शक तत्त्वांचं पालनही करावं लागणार आहे.

आणखी वाचा- खासगी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी, राज्य सरकारचा आदेश जारी

ओपन जिमच्या वापरास परवानगी नाही

सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, चालणे यांसारख्या व्यायामांना आता परवानगी देण्यात आली आहे. परंतु ओपन जिमच्या वापरावर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. ओपन एअर जिम, गार्डनमधील कोणत्याही वस्तू / खेळ यांचा वापर करण्याची मात्र परवानगी नसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 3:49 pm

Web Title: maharashtra government unlock new rules for opening shops gym gardens coronavirus jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 खासगी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी, राज्य सरकारचा आदेश जारी
2 राज्यात ५०० डॉक्टरांना करोनाचा संसर्ग; सायन रुग्णालयातील संख्या सर्वाधिक
3 कोल्हापूर : मुरगुड नगरपालिका मुख्याधिकाऱ्यावर संतप्त नागरिकांकडून चप्पल फेक
Just Now!
X