06 July 2020

News Flash

लंडनमधील डॉ. आंबेडकरांचे निवासस्थान विकत घेण्याचा सरकारचा निर्णय

लंडन शहरातील 'स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये शिक्षण घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात राहत होते, ते घर विकत घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

| January 24, 2015 03:27 am

लंडन शहरातील ‘स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये शिक्षण घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात राहत होते, ते घर विकत घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी यासंबंधीची घोषणा केली. तब्बल 35 कोटींना हे घर विकत घेण्याचा निर्णय झाला असून, सध्या घर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय, येत्या 14 एप्रिलपर्यंत हे निवासस्थान ताब्यात घेऊन त्या ठिकाणी डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करणारे स्मारक उभारण्याचा सरकारचा मानस असल्याची माहितीही तावडे यांनी दिली.
सन १९२१-२२ मध्ये डॉ. आंबेडकर राहत असलेले घर विकत घेण्याची इच्छा राज्य सरकारने केंद्राला पत्राद्वारे काही दिवसांपूर्वी कळविली होती. लंडनमधील किंग हेनरी रस्त्यावरील २,०५० चौरस फुटांच्या ही वास्तू काही दिवसांपूर्वी ४० कोटी रूपयामंध्ये लिलावात काढण्याचा निर्णय घरमालकाने घेतला होता . लंडनमधील ‘द फेडरेशन ऑफ आंबेडकरीज अॅन्ड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन’ (फाबो) संघटनेने राज्य आणि केंद्र सरकारला ही वास्तू ४० कोटी रूपयांमध्ये लिलावात काढण्यात आल्याची माहिती कळविली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2015 3:27 am

Web Title: maharashtra government will buy dr ambedkar residence in london
Next Stories
1 नक्षलवाद्यांनी १३ वाहने जाळली
2 जातपंचायतविरोधी कायदा आवश्यक
3 शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा
Just Now!
X