25 September 2020

News Flash

आपण क्वारंटाइन झाल्याचं वृत्त खोटं, राज्यपाल कोश्यारी यांनी दिली माहिती

करोना चाचणीचा रिपोर्ट आला निगेटिव्ह

संग्रहित छायाचित्र

राजभवनातील जवळपास १८ कर्मचाऱ्यांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतल्याचं वृत्त काही माध्यमांनी आपल्या म्हटलं होतं. त्यावर स्वतः राज्यपालांनी माहिती दिली असून, आपण स्वतःला क्वारंटाइन केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यपालांचं निवासस्थान व कार्यालय असलेल्या राजभवनात जवळपास १८ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर मुंबई महापालिकेनं या कर्मचाऱ्यांच्या पुन्हा एकदा चाचण्या केल्या आहेत. तसेच राजभवनाचं सॅनिटायझेशनही करण्यात आलं आहे. दरम्यान, करोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. ते वृत्त निराधार असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

“आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहो. आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे,” असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

राजभवनातील जवळपास १८ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं होतं. राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या राजभवनातील कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी १८ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या कर्मचाऱ्यांची मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं चाचणी करण्यात आली. तसेच महापालिकेन राजभवनाचं तातडीनं सॅनिटायझेशनही केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 2:06 pm

Web Title: maharashtra governor clarify on false news about self quarantine bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 ऑनलाइन शिक्षणाऐवजी, शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना घरपोच शिक्षण
2 परीक्षांसदर्भात राज्यपालांनी आतातरी पुनर्विचार करावा; संजय राऊत यांचा सल्ला
3 केंद्राच्या दोन योजनांमुळे पाटबंधारे प्रकल्पांची कामे सुरु : जयंत पाटील
Just Now!
X