02 March 2021

News Flash

ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांना ‘आर्थिक’ बळ; मानधनात केली मोठी वाढ

कंत्राटी डॉक्टरांचे आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करणार

राज्यात करोनाविरोधातील लढा युद्धपातळीवर सुरू आहे. करोनाग्रस्त रुग्णांना बरं करण्यासाठी डॉक्टर रात्रंदिवस मेहनत घेत असून, डॉक्टरांच्या या करोनाविरोधातील लढाईला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं मोठं आर्थिक बळ दिलं आहे. राज्य सरकारनं बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच कंत्राटी डॉक्टरांचे आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय घेतला आहे.

बंधपत्रित आणि कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मोठा निर्णय घेतला. बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधना वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राज्यात कंत्राटी पद्धतीनं कार्यरत असलेल्या डॉक्टरांनाही सरकारनं दिलासा दिला आहे. कंत्राटी डॉक्टरांचं आणि बंधपत्रित डॉक्टारांचं मानधन समान करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.

मानधनात किती होणार वाढ?

करोनामुळे राज्यातील आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असला, तरी राज्य सरकारनं डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यासाठी बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात घसघशीत वाढ केली.

१) वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रित डॉक्टरांना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार

२) आदिवासी भागातील बंधपत्रित विशेषज्ञ डॉक्टरांना ७० हजार ऐवजी ८५ हजार

३) इतर भागातील एमबीबीएस डॉक्टरांना ५५ हजारांऐवजी ७० हजार

४) इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टरांना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येईल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 5:17 pm

Web Title: maharashtra govt increase payment of doctors on contract and bond bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अंतिम वर्षाची परीक्षा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या कुलगुरूंसोबत महत्त्वाची बैठक
2 उपेक्षित सचिन सावंत यांनी पदासाठी अपेक्षित अभ्यास करूनच बोलावं; शेलारांचा टोला
3 सातारा : आता जिल्हा रुग्णालयात ‘ट्रूनॅट’ मशीनद्वारे होणार COVID-19 च्या चाचण्या
Just Now!
X