महाराष्ट्रात आजपासून आर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षण लागू करण्यात आलं आहे. फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी आता महाराष्ट्रातही करण्यात आली आहे. आज अध्यादेश काढून हे आरक्षण लागू करण्यात आलं आहे.

राज्यमंत्रिमंडळाने आर्थिकदृष्ट्या मागासांना 10 टक्के आरक्षण देण्यास मंजुरी दिली होती. आजपासून हे आरक्षण लागू करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देणारं पहिलं राज्य गुजरात ठरलं आहे. आता महाराष्ट्रातही हे आरक्षण देण्यात आलं आहे.

वर्षाकाठी 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या आर्थिक मागासांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हे आरक्षण मिळण्यासाठी प्राप्तिकर प्रमाणपत्र आवश्यक आहे. आरक्षण मिळवण्यासाठी जात प्रमाणपत्रही आवश्यक आहे. तसेच आधार कार्डही लागणार आहे.