राज्य सरकार सर्वच नैसíगक आपत्ती हाताळण्यात अपयशी ठरत आहे. स्वाइन फ्लू साथीबाबतही सरकार उदासीन असल्याने आरोग्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा व आरोग्य संचालक, उपसंचालकांना तात्काळ बडतर्फ करावे, याबरोबरच हवामानावर आधारित पीकविमा योजनेचे निकष बदलावे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.
राज्यात स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळत आहेत, परंतु ही साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारचा आरोग्य विभाग उदासीन असून, आरोग्यमंत्री व अधिकारी मुंबईच्या बाहेर पडायला तयार नाहीत. अनेक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा साठा नाही हे सरकारचे अपयश असल्याने आरोग्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा व आरोग्य संचालक, उपसंचालक यांना तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी केली.
 राज्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक नैसíगक आपत्तीमुळे वाया जाणार आहे. या अवेळी झालेल्या पावसामुळे कोकणात आंबा, काजू, फळबागा व राज्यातही इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. सरकारने शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, हे सरकारचे अपयश आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने सर्व नियम बाजूला ठेवून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली.