News Flash

ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती; वैद्यकीय क्षेत्रासह उद्योगांनाही पुरवठा करण्याची सक्ती

ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय
संग्रहित छायाचित्र

राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात रुग्णसंख्येची उच्चांकी नोंद होऊ लागली आहे. शनिवारी राज्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ नोंदवण्यात आली असून, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन या रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेत दिलासा दिला आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ऑक्सिजनच्या मागणी-पुरवठ्यातील संतुलन राखण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. “राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबरोबरच रुग्णांना लागणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूला (ऑक्सिजन) देखील मागणी वाढत आहे. याची तातडीने दखल घेऊन साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के व उद्योगांसाठी २० टक्के या प्रमाणात प्राणवायू पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी राज्यात डिसेंबर २०२० पर्यंत लागू राहील. यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी ५० ते ६० टक्के आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी ४० ते ५० टक्के या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा केला जायचा,” असं राजेश टोपे म्हणाले.

“आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात कायद्यान्वये बदल करून पुरवठ्याचे प्रमाण ८० टक्के वैद्यकीय क्षेत्रासाठी, तर २० टक्के उद्योगांसाठी असे करण्यात आले. यामुळे रुग्णांना प्राणवायूची कमतरता भासणार नाही, याची आम्ही दक्षता घेत आहोत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 9:07 pm

Web Title: maharashtra govt took decision on oxygen supply bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सुटल्यावर एकाएकाचे थोबाड फोडील; परळीच्या डॉ. सुदाम मुंडेची अधिकाऱ्यांना धमकी
2 चंद्रपूर जिल्ह्यात २४ तासांत २६२ नवे करोनाबाधित; पाच रुग्णांचा मृत्यू
3 दाऊदकडून ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी; राणे बंधुनी केलं ट्विट, म्हणाले…
Just Now!
X