21 January 2021

News Flash

सारथी बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी देणार; अजित पवारांची घोषणा

सारथी नियोजन खात्याच्या अखत्यारित घेणार

मागील काही दिवसांपासून राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या सारथी संदर्भात राज्य सरकारनं आज मोठा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सारथीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती पवार यांनी दिली. “सारथी बंद होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार. तसेच उद्याच सारथीला आठ कोटींचा निधी दिला जाईल,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

मराठा समाजातील मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सारथी संस्था सुरू करण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, स्वायत्ता आणि गैरव्यवहारावरून ही संस्था चर्चेत आहे. यावरून राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे हा वाद चिघळला होता.

या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करत बैठक बोलावली होती. या बैठकीली छत्रपती संभाजीराजे भोसले, विजय वडेट्टीवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. याबैठकीत संस्थेच्या विविध समस्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. “सारथी संस्था बंद होणार नाही. मागील काही काळात गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनामध्ये चुकीचा मेसेज गेला होता. मात्र, हे होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात येईल. त्याचबरोबर सारथीला उद्याच विजय वडेट्टीवार हे आठ कोटी रुपयांची मदत देतील,” असं अजित पवार म्हणाले.

“माझ्या हॉलमध्ये सगळी लोक बसू शकत नाही. त्यामुळे हॉलमध्ये गेलो होतो. पण, चांगला निर्णय घेणं महत्त्वाचं की त्याला वेगळे फाटे फोडायचे हे बघा. दर दोन महिन्यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल. सारथी संस्था चांगल्या पद्धतीनं काम करेल. आजच्या बैठकीत त्या अनुषंगानं सकारात्मक चर्चा झाली आहे. सारथी संस्थेनं केलेला सगळा खर्च संस्थेच्या संकेतस्थळावर देण्याची सूचना केली आहे,” असं अजित पवार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 1:34 pm

Web Title: maharashtra govt will 8 crore fund to sarathi ajit pawar announced decission bmh 90
Next Stories
1 चोरीच्या संशयावरून मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलाचा खून; पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
2 महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय
3 “उद्धवजी पण गारद का?” फडणवीसांचा शरद पवारांच्या मुलाखतीवरुन टोला
Just Now!
X