25 May 2020

News Flash

लोकसेवा हक्क विधेयक विधानसभेत मंजूर

या कायद्यामुळे एकूण ११० सेवा अधिसूचित केल्या जाणार आहेत.

| July 14, 2015 03:02 am

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेवर आल्यावर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घोषित करण्यात आलेले महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक मंगळवारी विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आले. या कायद्यामुळे एकूण ११० सेवा अधिसूचित केल्या जाणार आहेत.
या विधेयकावर बोलताना फडणवीस म्हणाले, भ्रष्टाचार टाळण्यासाठी हा कायदा उपयुक्त ठरणार आहे. या अगोदरच हा कायदा अस्तित्त्वात यायला पाहिजे होता. दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर झाल्यावर सरकार तातडीने त्यासंदर्भातील नियम तयार करेल. ही नवीन व्यवस्था तयार करण्यात येत असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करताना ज्या त्रुटी आढळतील त्यामध्ये सुधारणा करायलाही सरकार तयार आहे.
राज्य सरकारच्या अखत्यारितील एकूण ११० सेवा या कायद्यामुळे नागरिकांना निर्धारित वेळेत उपलब्ध होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2015 3:02 am

Web Title: maharashtra guarantee of public service bill passed in assembly
टॅग Devendra Fadnavis
Next Stories
1 ‘ज्यांच्याकडून आपण जीवन घेतो, त्यांच्याच जीवनावर घालाही घालतो’
2 ‘अजित पवारांच्या सूचनेमुळेच १८९ प्रकल्प वादग्रस्त’
3 विज्ञानानंतर वाणिज्यला पसंती; कला शाखेला मुलेच मिळेनात!
Just Now!
X