News Flash

राज्यात करोनाच्या चाचणीसाठी १२ लाख सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित; राजेश टोपेंच्या कबुलीने खळबळ

कंपनीवर कारवाईचा इशारा

संग्रहित

राज्यातील करोना परिस्थिती अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात नसताना करोना चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कबुलीमुळे खळबळ माजली आहे. करोना संसर्गाची तपासणी करण्यात येणाऱ्या आरटी पीसीआरच्या १२ लाख ५० हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. जालना येथे एबीपी माझाशी बोलताना त्यांनी माहिती दिली.

“राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिला,” असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. “वैद्यकीय संचालनालयाकडून किट्सची खरेदी करण्यात येत असून GCC Biotech ltd या कंपनीच्या किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आला आहे. तसंच सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करणार,” असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. “जिथे किट्सचं वाटप झालं आहे तेथील निकाल चुकीचे येण्यापेक्षा ते थांबवून तात्पुरतं एनआयव्हीने त्यांच्या किट्स उपलब्ध करुन द्यायचा असा निर्णय झाला आहे. जेणेकरुन टेस्टिंग थांबू नये. एनआयव्हीकडून सगळ्या टेस्ट केल्या जातील,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 8:24 pm

Web Title: maharashtra health minister rajesh tope says 12 lakh defective rt pcr kits distributed sgy 87
Next Stories
1 राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचे जेजुरीत आंदोलन
2 “राज्यपालांची पत्रातील भाषा वाचून…”; शरद पवारांनी थेट मोदींना लिहिलं पत्र
3 एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार? फडणवीसांनी सोडलं मौन; म्हणाले…
Just Now!
X