News Flash

हिंगणघाट पीडितेच्या अंत्यसंस्कारासाठी भावाची प्रतीक्षा

पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर आता तिच्या अंत्यसंस्काराला विलंब होऊ शकतो.

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेने सोमवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर आता तिच्या अंत्यसंस्कारासाठी भावाची प्रतिक्षा आहे.  पीडित तरुणीचा भाऊ जळगावला इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. परीक्षा असल्या कारणाने भाऊ तिथेच थांबला होता.

आज सकाळी बहिणीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तो वर्ध्याला येण्यासाठी जळगावहून निघाला आहे. वर्ध्याला ट्रेन पोहोचायला संध्याकाळचे चार वाजतील. तो आता अमरावतीपर्यंत पोहोचला आहे. वर्ध्याला उतरल्यानंतर पीडितेच्या भावाला तिथून गावापर्यंत नेण्यासाठी प्रशासनाने गाडीची व्यवस्था केली आहे.

हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे यानं तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. तरूणीनं आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 2:39 pm

Web Title: maharashtra hinganghat victim died in hospital dmp 82
Next Stories
1 हिंगणघाट जळीतकांड: “पोलिसांना बंदुका फक्त हवेत गोळी मारायला दिल्यात का?”
2 हिंगणघाट जळीतकांड: महाराष्ट्र दयामाया दाखवणार नाही, आरोपीला फासावर लटकवू – उद्धव ठाकरे
3 हिंगणघाटमध्ये पीडितेच्या मृत्यूनंतर तणाव, रुग्णवाहिका अडवली; पोलीस आणि नागरिकांमध्ये धक्काबुक्की
Just Now!
X