05 June 2020

News Flash

तबलिगी मरकज : राज्याच्या गृहमंत्र्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांकडे मागितली आठ प्रश्नांची उत्तरे

या आठ प्रश्नांची उत्तरं अमित शाह देणार का?

देशभरात करोनाचा फैलाव वाढतो आहे. अशातच दिल्लीतल्या निजामुद्दीन मध्ये तबलिगी जमातचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली. तबलिगी जमातने माहिती लपवून ठेवल्याचेही आरोप झाले. आता याच सगळ्या प्रकरणावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आठ प्रश्न विचारले आहेत. आता या प्रश्नांची उत्तरं अमित शाह देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अनिल देशमुख यांनी विचारलेले आठ प्रश्न

केंद्रात गृह मंत्रालयाने निजामुद्दी, दिल्लीमध्ये तबलिगी मरकजच्या इज्तेमाचं आयोजन करण्यासाठी परवानगी का दिली?

निजामुद्दीन मरकजच्या शेजारीच निजामुद्दीन पोलीस स्टेशन आहे. असं असूनही हे आयोजन थांबवलं का गेलं नाही ? यासाठी गृह मंत्रालय जबाबदारी नाही का?

ज्या पद्धतीने मरकजमध्ये इतकी गर्दी झाली व करोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव राज्यांमध्ये झाला त्याला केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का?

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवल यांना रात्री दोन वाजता मरकजमध्ये का पाठवण्यात आलं? हे काम डोवल यांचं आहे की दिल्ली पोलीस आयुक्तांचं?

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे तबलिगचे पुढारी मौलाना साहाब रात्री दोन वाजता मरकजमध्ये काय गुप्त यंत्रणा करत होते?

अजित डोवल आणि दिल्ली पोलीस आयुक्त या दोघांनीही या विषयावर बोलणं का टाळलं?

कोणाशी याचे संबंध आहेत?
मरकजच्या आयोजनाची परवानगी तुमची..
कार्यक्रम तुम्ही रोखला नाहीत
तबलिगींशी संबंध तुमचे.. या सर्व प्रश्नांचे उत्तर देणार कोण?

 

असे प्रश्न उपस्थित करत अनिल देशमुख यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच हे प्रश्न विचारले आहेत. आता अमित शाह यावर काही भूमिका घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 7:44 pm

Web Title: maharashtra home minister anil deshmukh ask 8 questions to union home minister amit shah on tablighi markaz scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 लॉकडाउन वाढणार की, संपणार, ११ एप्रिलनंतर अंतिम फैसला
2 इंदूर : लॉकडाऊन बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलवर दगडांनी हल्ला, ६ अटकेत
3 हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधाच्या साठयाबद्दल आरोग्य मंत्रालयाने दिली अत्यंत महत्वाची माहिती…
Just Now!
X