News Flash

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी

पाहा नक्की काय आहे प्रकरण

संग्रहीत

“राज्यातील महिलांवर होणारे अत्याचार कमी होत नसून दिवसेंदिवस वाढत आहेत. संभाजीनगरमध्ये तरूणीवर अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या अध्यक्षाला गुन्हा दाखल होताच तात्काळ अटक करण्याऐवजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाठिशी घातलं आहे. म्हणून आरोपीला पाठिशी घालणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी बुधवारी केली.

“तुझ्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात…”; संजय राऊत भाजपा नेत्यांच्या निशाण्यावर

“राष्ट्रवादीच्या युवा अध्यक्षावर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट फिरत आहे. पत्रकार परिषदेत बसण्याचे धाडस करत आहे. हे केवळ गृहमंत्र्यांच्या आशीर्वादानेच होत आहे. ज्यावेळी बलात्काराचा गुन्हा दाखल होतो, त्यावेळी पिडीतेवर कोणताही दबाव येऊ नये, पुराव्यामध्ये छेडछाड होऊ नये म्हणून आरोपीला तात्काळ अटक करून नंतर पुढची कारवाई केली जाते. ‘आरोपी असेन तर शिक्षा भोगण्यास तयार आहे’ असे विधान पत्रकार परिषद घेऊन केले जाते. जर तुमची बाजू बरोबर असेल, तर गुन्हा दाखल होताच पोलिसांकडे स्वत:ला सुपूर्द का केले नाही? पोलिसांना तपासासाठी सहकार्य का केलं नाही? अशा पद्धतीने बाहेर मोकाट फिरून पिडीतेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न का केला जात आहे? अशा परिस्थितीत असं दिसून येतं की आरोपी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याने खुद्द गृहमंत्र्यांनीच कायद्याला बगल दिली आहे”, असा आरोप विक्रांत पाटील यांनी केला.

अर्णब गोस्वामी यांची त्यांच्याच शो मध्ये ‘बोलती बंद’; चर्चेसाठी आलेल्या प्रवक्त्याने सुनावलं…

“राज्याचे, राज्यातील महिलांचे संरक्षण करणे हे गृहमंत्र्यांचे कर्तव्य आहे. पण हे मंत्री गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत. ‘शक्ती कायदा’ लागू करून जर गृहमंत्रीच आरोपीचे रक्षण करणार असतील तर कायद्याची अंमलबजावणी तरी कशी होणार? राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सुप्रियाताई सुळे आणि रूपालीताई चाकणकर या अशा परिस्थितीत पिडीतेच्या बाजूने उभ्या राहणार की राष्ट्रवादीच्या आरोपी कार्यकर्त्यांच्या बाजूने? या आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या. गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून हा खटला शक्ती कायद्यानुसार फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पिडीतेला न्याय द्यावा”, अशी मागणीही त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 7:23 pm

Web Title: maharashtra home minister anil deshmukh must resign demands bjp yuva morcha chief vikrant patil vjb 91
Next Stories
1 कल्याणमधील टॅक्सी चालकाचा वाईमध्ये खून
2 ‘सीरम’च्या पुनावाला यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्या; मनसेची मागणी
3 “सत्ता विश्वासघाताने मिळवता येते पण..”;भाजपाचा सेनेला टोला
Just Now!
X