News Flash

फोन टॅपिंगप्रकरणाची चौकशी होणार; गृहमंत्र्यांचे आदेश

निवडणुकांदरम्यान बड्या व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अनिल देशमुख, गृहमंत्री

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तत्कालिन सरकारनं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींचे फोन टॅप झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही बड्या नेत्यांचे फोन आणि व्हॉट्सअॅप टॅप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कांग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीही माध्यमांसमोर काही आरोप केले होते. त्यानंतर आता याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्यांचा कोणाचा यामध्ये सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असे प्रकार घडत असतील तर यापुढे सर्वसामान्यांचेही फोन केले जाऊ शकतात. यावर चाप लावणं आवश्यक आहे. सरकार त्या दृष्टीनं नक्कीच प्रयत्न करेल अशी अपेक्षा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले होते.

आणखी वाचा – फोन टॅप हो रहे है, भाजपा मंत्र्याचीच माहिती: संजय राऊत

तर संजय राऊत यांनीदेखील फोन टॅपिंगची आपल्याला कल्पना होती, असं म्हटलं होतं. “तुमचा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं दिली होती. जर माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल तर त्यांचं स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. मी कोणत्याही गोष्टी लपून करत नाही. ऐका माझं बोलणं,” अशा आशयाचं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 1:18 pm

Web Title: maharashtra home minister anil deshmukh order for investigation phone tapping jud 87
Next Stories
1 महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढणं सुडबुद्धीनं घेतलेला निर्णय : रोहित पवार
2 शांततेच्या मार्गाने बंद करा, प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन
3 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातले १० ठळक मुद्दे
Just Now!
X