राज्य मंडळातर्फे बारावीचा निकाल आज (मंगळवार) दुपारी चार वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयनिहाय गुण असलेल्या निकालाची प्रत डाऊनलोड करून घेता येईल. दरम्यान, राज्य मंडळाने बारावीचा निकाल ९९.६३ टक्के जाहीर केला आहे. मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील निकाल यांनी निकाल जाहीर केला आहे. यामध्ये ४६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.

करोना प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने बारावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे राज्य मंडळाला पालन करता आले नाही. बारावीच्या निकालावर विविध पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अवलंबून असल्याने राज्य मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते.

या ठीकाणी चार वाजता पाहता येणार निकाल

https://hscresult.net

11admission.org.in

https://msbshse.co.in

maharesult.nic.in

hscresult.mkcl.org

शाखेनिहाय निकाल

विज्ञान शाखा  – ९९.४५ टक्के कला शाखा  – ९९.८३ टक्के वाणिज्य शाखा – ९९.९१ टक्के उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – ९८.८० टक्के