News Flash

महाराष्ट्र सर्वात कमी धूम्रपान करणारे राज्य

राज्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवला जात आहे.

‘ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सव्‍‌र्हे’च्या पाहणीतील निष्कर्षांनुसार देशभरात महाराष्ट्र हे धूम्रपानाचे सर्वात कमी प्रमाण असणारे राज्य आहे. ‘तंबाखूमुक्त शाळा’ अभियानांतर्गत आतापर्यंत २ हजार ७५५ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत.

सलाम बॉम्बे फाऊंडेशन, संबंध हेल्थ फाऊंडेशन, टाटा रुग्णालय यांच्या सहकार्याने राज्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवला जात आहे. ‘ग्लोबल अ‍ॅडल्ट सव्‍‌र्हे’२०१६-१७ नुसार महाराष्ट्रात धूम्रपानात २.१ टक्क्याने आणि धूम्रविरहित तंबाखू सेवनात ३.१ टक्क्याने घट झाल्याचे आढळून आले आहे. सध्या राज्यातील धूम्रपानाचे प्रमाण ३.८ असून ते इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणीनुसार राज्यात २००५-०६ साली तंबाखू सेवनाचे प्रमाण स्त्रियांमध्ये १०.५ तर पुरुषांमध्ये ४८.३ होते. हे प्रमाण २०१५-१६ साली अनुक्रमे ५.८ आणि ३६.६ टक्क्यांवर आले आहे. जिल्हा स्तरावर ३०९ तंबाखू मुक्ती केंद्रांतून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत समुपदेशन  के ले जाते. डिसेंबर २०१८ अखेर समुपदेश केलेल्या १ लाख ४२ हजार जणांपैकी ६,३२४ जणांनी तंबाखू सेवन बंद के ले आहे. तसेच ८०४ आरोग्य संस्था तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत. ‘कोटपा’ कायद्यांतर्गत डिसेंबर २०१८ अखेर राज्यात १५,३९,१७४ रुपये एवढा दंड वसूल केला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यामुळे तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा प्रभाव दिसत असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 12:23 am

Web Title: maharashtra is the least smoking state
Next Stories
1 कडाक्याच्या थंडीने महाबळेश्वर गोठले
2 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना लालफितीत
3 कृषिकन्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे
Just Now!
X