News Flash

शरजील उस्मानीचं धार्मिक भावना दुखावणारं ट्विट; जालन्यात गुन्हा

हिंदू जागरण मंचाच्या कार्यकर्त्याने केली होती तक्रार

शरजील उस्मानी

अलिगढ मुस्लिम विद्यापीठामधील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी यांच्याविरोधात महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. शरजील उस्मानीचं हिंदूच्या धार्मिक भावना दुखावणार ट्विट केलं आहे अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर उस्मानीवर गुन्हा दाखल झाला आहे.

जालन्याच्या येथील अंबड येथे राहणाऱ्या हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते अंबादास अंभोरे यांनी उस्मानीविरोधात तक्रार नोंदवली आहे. “उस्मानी याने ट्विटरवर केलेल्या काही ट्विटमध्ये भगवान राम यांच्याबद्दल चुकीच्या शब्दांचा वापर केला होता त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या”, असल्याचे त्यांनी सांगितले.

या तक्रारीच्या आधारे अंबड पोलिसांनी उस्मानीविरोधात बुधवारी रात्री भारतीय दंड संहिता कलम २९५-अ (धार्मिक भावनांना भडकावणारे द्वेषपूर्ण कृत्य) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण जालना सायबर सेलकडे देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, ३० जानेवारी रोजी पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या वेळी केलेल्या भाषणावरून उस्मानीविरोधात १५३- अ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई न करता उस्मानीचा जबाब नोंदवून घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले होते. तसेच उस्मानी याला स्वारगेट पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मार्च महिन्यात स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये त्याचा जबाब नोंदवण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 1:42 pm

Web Title: maharashtra jalna fir against sharjeel usmani over objectionable tweets abn 97
Next Stories
1 दोन कोटी लसी जमिनीतून उगवल्या का?; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल
2 राज्याने शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रूपये अनुदान द्यावे – केशव उपाध्ये
3 “भाजपामध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा”
Just Now!
X