News Flash

विधान परिषदेच्या एका जागेसाठी २ सप्टेंबरला मतदान

विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या दोन सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी दिली.

| August 12, 2013 07:04 am

विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या दोन सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी दिली. भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेवर गेलेले धनंजय मुंडे यांनी गेल्या दोन जुलै रोजी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे.
१६ ऑगस्ट रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. २३ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. दोन सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येईल आणि त्यानंतर त्याचदिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 7:04 am

Web Title: maharashtra legislative council bypoll on sept 2
Next Stories
1 काँग्रेसचा आता स्वबळाचा नारा
2 शिराळ्यात नागपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी
3 धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना कोठडी
Just Now!
X