News Flash

Maharashtra Lockdown : राज्यात संचारबंदीत लोकल, बससेवा सुरू राहतील पण ….

मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; राज्यात उद्यापासून १५ दिवसांसाठी संचारबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे.

राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(मंगळवार) फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना राज्यात १५ दिवसांसाठी संचारबंदीची मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी संचारबंदीच्या काळात काय बंद असणार, कोणत्या सेवा सुरू राहणार, कोणासाठी असणार याबाबत देखील माहिती दिली. त्यानुसार संचारबंदीच्या काळात वाहतूक व्यवस्थेबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ”आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही आहोत, लोकल बस सुरू राहतील, पण त्या अत्यावश्यक व जीवनाश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्याजाण्यासाठी सुरू राहील,” असं स्पष्ट केलं.

Maharashtra Lockdown Guidelines : महाराष्ट्रात उद्या रात्रीपासून लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

तसेच, राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठीशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राने मदत करावी, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य –
राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेऱीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 10:04 pm

Web Title: maharashtra lockdown local and bus services will continue in the state but msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Lockdown लावला, तर रोजीरोटीचं काय? मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आर्थिक मदत!
2 हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राने मदत करावी, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
3 Maharashtra Lockdown Guidelines : महाराष्ट्रात उद्या रात्रीपासून लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
Just Now!
X