News Flash

प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे सरकारला केली विनंती; म्हणाले…

"...याने सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या पोटावर पाय येईल"

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर.

करोना परिस्थितीमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना स्वयंशिस्त पाळण्याचं कळकळीचं आवाहन करतानाच लॉकडाउन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन होण्याच्या भीतीने लोकांच्या मनात धस्स झालं असून, लॉकडाउन न करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला विनंती केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील करोना परिस्थितीची जाणीव करून मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना करोना नियमावलीबाबत स्वयंशिस्त पाळण्याचं आवाहन केलं. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर पडणाऱ्या ताणाबद्दल कल्पना देत परिस्थिती कायम राहिली, तर लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचं ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर लॉकडाउन न करण्याची मागणी होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही ट्वीट करून सरकारला विनंती केली आहे. “लॉकडाऊन पुन्हा लावण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होतात. याने सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या पोटावर पाय येईल. लॉकडाऊननं करोना आटोक्यात येणार नाही. शिस्त पाळणे, फिजिकल अंतर पाळणे गरजेचं आहे. सरकारला आमची विनंती राहील की, लॉकडाऊन करू नये,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

“मी पूर्ण लॉकडाउनचा इशारा देत आहे…”

“लसीकरणात महाराष्ट्र एक नंबरचे राज्य ठरले. काल (१ एप्रिल) एका दिवसात ३ लाख नागरिकांचं लसीकरण केलं. केंद्रानं लसींचा पुरवठा वाढवला तर लसीकरणाची क्षमता एका दिवसात ६ ते ७ लाखांपर्यंत नेऊ. लस घेतल्यानंतरही काही जण करोनानं बाधित होतात, कारण लस घेतल्यानंतरही मास्क घालणं अनिवार्य आहे पण बरेच जण हे पाळत नाहीत. मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देत आहे. लॉकडाऊन जाहीर करत नाहीए, पण दोन दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊ. मला आपल्या सहकार्याची अपेक्षा नाही, विश्वास आहे. सर्व राजकीय पक्ष, सर्व धर्मियांचे सहकार्य अपेक्षित आहे. ही लढाई जिंकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा,” असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 8:40 am

Web Title: maharashtra lockdown prakash ambedkar appeal to maharashtra cm uddhav thackeray bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 बघा तुमचं वजन वापरून काही मिळतं का?; फडणवीसांना जितेंद्र आव्हाडांचा टोला
2 लॉकडाउनचा इशारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना फडणवीसांचा सल्ला; म्हणाले…
3 बावधनमध्ये बंदी आदेश झुगारत हजारोंच्या उपस्थितीत बगाड यात्रा
Just Now!
X