महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरमधील महालक्ष्मी देवीला घागरा- चोळी घालण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. महालक्ष्मीला पूर्वापार काठपदराची साडी नेसवली जात असताना घागरा-चोळी का घालण्यात आली असा प्रश्न भाविकांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी शिवसेनेने पुजाऱ्यांविरोधात (श्री पुजक) धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचा घागरा-चोळीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. महालक्ष्मीला काठपदराची साडी नेसवण्याची परंपरा आहे. मग ही परंपरा मोडून घागरा-चोळी का घालण्यात आली अशी कुजबुज भाविकांमध्ये सुरु झाली. याची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आक्रमक झाले. त्यांनी मंदिरातील श्री पुजकांना जाब विचारला. योगेश जोशी नामक भाविकाने कोल्हापूरच्या देवीला घागरा-चोळी अर्पण केली होती. त्याची किंमत सुमारे ३५ हजारपर्यंत होती अशी माहिती समोर आली. मंदिरातील श्री पुजक अजित ठाणेकर यांनी देवीला घागरा-चोळी घातली होती. ठाणेकर यांनीच देवीचे घागरा-चोळीतील छायाचित्र प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीसाठी दिले होते.

farmer near chakan planted 66 cannabis plants in corn field
पिंपरी : चाकणमध्ये मक्याच्या शेतात गांजा
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक

साडी आणि खणा-नारळाने अंबाबाईची ओटी भरण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. देवीला घागरा-चोळी अर्पण करणे आणि पुजाऱ्यांनी ती स्वीकारणे योग्यच पण देवीला घागरा चोळी का घालण्यात आली असा संतप्त सवाल भाविकांनी उपस्थित केला यावादाविषयी जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, तृप्ती देसाई या महालक्ष्मी देवीच्या गाभाऱ्यात येत असताना त्यांच्या पेहरावावर आक्षेप घेण्यात आला होता. गाभाऱ्यात जाताना महिलेने साडी नेसावी असे मंदिरातील श्री पुजक आणि महिला भक्तांनी म्हटले होते. तृप्ती देसाई सलवारसूट घालून आलेल्या चालत नाही. मग देवीला साडीऐवजी घागरा-चोळी का घालण्यात आली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणी अजित ठाणेकर, बाबुराव ठाणेकर आणि योगेश जोशी या तिघांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, श्री करवीर निर्वासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपुजक मंडळाने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवारी जी अलंकार पूजा बांधण्यात आली ती राजस्थानमधील देवी खोडीवारच्या पूजेशी साधर्म्य साधणारी असल्याचे मंडळाने म्हटले आहे. देवीची कुमार स्वरुपातील पूजा बांधताना अशीच बांधली जाते असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.राजस्थानी घागरा ही गोल शिवलेली साडीच असते. महालक्ष्मी देवीला अलंकार पूजा बांधण्यात काहीच गैर नाही असे मंडळाने आवर्जून स्पष्ट केले.