News Flash

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे करोना पॉझिटिव्ह

ट्विटद्वारे दिली आहे माहिती ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

संग्रहित

राज्यातील करोना संसर्ग अतिशय वेगाने वाढत आहे. सामान्य नागरिकांपासून ते अगदी व्हीआयपी व्यक्तींसह मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात अडकत आहेत. आता राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

आदित्य ठाकरे यांनी स्वतः ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.  असं त्यांनी आवाहन केलं आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आदित्य ठाकरे हे १५ ते  १७ मार्च  असे सलग तीन दिवस ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एका खासगी रिसोर्टमध्ये मुक्कामी होते. ठाकरे यांचा हा दौरा पूर्णत: खासगी होता. या दौऱ्यात त्यांनी व्याघ्र सफारीचा आनंद लुटल्याची माहिती समोर आलेली आहे.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तीन दिवस होते ताडोबात मुक्कामी!

या दौऱ्यात ताडोबात त्यांच्यासोबत आणखी कोण होते? याची माहिती मिळू शकलेली नाही. एका रिसोर्टमध्ये त्यांचा मुक्काम होता. रिसोर्ट कंपनीनेही या दौऱ्याबाबत गुप्तता बाळगली होती. मात्र भाजपा आमदार नितेश राणे यांच्या टीकेनंतर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सर्वांना माहिती झाली होती. विशेष म्हणजे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनाही या दौऱ्याची कल्पना नव्हती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 6:44 pm

Web Title: maharashtra minister aaditya thackeray tests positive for covid19 msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 परप्रांतीय मजुरांचा पुन्हा परतीचा प्रवास! नागपूर बसस्टँडवर लागल्या रांगा!
2 १०वी, १२वीच्या परीक्षा ऑफलाईन, पण परीक्षा काळात विद्यार्थ्याला करोना झाला तर? वाचा काय म्हणाल्या शिक्षणमंत्री!
3 “UPA चं नेतृत्व आता शरद पवारांनी करावं”, संजय राऊतांनी घेतली पत्रकार परिषदेत भूमिका!
Just Now!
X